सर्व १५ उमेदवार ठरले विजयी
देऊळगाव राजा : तालुका खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या ७ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली.३० मतदार संख्या असलेल्या ह्या निवडणुकीत ९ पैकी सात उमेदवार निवडून आले तर मतदानापूर्वी आठ उमेदवार अविरोध निवडून आले होते.
येथील तालुका खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या निवडणुक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर राज्य शासनाने दोन वेळा निवडणूक पुढील आदेशापर्यंत स्थगती दिली. तर नंतर ३० जून रोजी मतदानाचे आदेश धडकले.त्यानुसार ७ जागांसाठी ९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. व एकूण ३० मतदारांनी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीत शंभर टक्के मतदान झाले.आठ वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली,२ वाजेपर्यंत एकही मतदार मतदान कक्षाकडे फिरकला नाही. व २ २० वाजता २८ मतदान झाले. तर दोघांनी शेवटच्या तासात मतदान केले. आज जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक निकालात बुरकुल मधुकर पुंजाजी, चित्ते पुंजाजी विष्णू, कोल्हे शिवाजी देवराव, लहाने श्रीकृष्ण पुरुषोत्तम, सरोदे विनोद पुंडलिक, शेरे गबाजी नामदेव आणि तिडके सारंगधर धुराजी असे सात उमेदवार विजयी ठरले तर घोंगे प्रमोद रामेश्वर व खरात शंकर बाबुराव यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत माजी मंत्री आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांचे वर्चस्व दिसून आले.