आ. डॉ. शिंगणे आणि मुख्याधिकारी अरुण मोकळ यांच्या प्रयत्नाला यश
देऊळगाव राजा : अशरफ पटेल : शहरातील नगरपालिकेच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मराठी प्राथमिक शाळा क्रमांक एकच्या नवीन इमारतीसाठी राज्य सरकारने १ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून माजी मंत्री आ. डॉ. राजेंद्र शिंगणे आणि मुख्याधिकारी अरुण मोकळ यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
शहरात नगरपालिकेच्या अंतर्गत मराठी प्राथमिक शाळा आणि उच्च माध्यमिक विद्यालय आहेत. यामध्ये नगरपालिकेच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मराठी प्राथमिक शाळा क्रमांक एकच्या ईमारतीचा समावेश होता. अंदाजे ५० ते ६० वर्षांपूर्वी ही इमारत बांधण्यात आली होती. या इमारतीमध्ये एकूण दहा खोल्यांमध्ये शहरातील मुले मुली शिक्षण घेत होती. कालांतरानंतर या इमारतीचा काही भाग व काही खोल्या जीर्ण होऊ लागल्या होत्या, त्यामुळे नगरपालिका मराठी प्राथमिक शाळेला शाळेला नवीन इमारत व्हावी ही मागणी पुढे आली. मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी सतत पाठपुरावा केल्याने सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी नगरपालिकेच्या मराठी प्राथमिक शाळा क्रमांक एकच्या नविन इमारतीसाठी राज्य सरकारकडे मागणी केली. आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नाला यश येऊन राज्य सरकारने नगरपालिका मराठी प्राथमिक शाळा क्रमांक एक च्या नवीन इमारतीसाठी १ कोटी ३१ लाख ५२ हजार ५२५ रुपयांचा निधी तातडीने मंजूर केला आहे, आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नामुळे हा निधी प्राप्त झाला आहे. नगरपालिकेच्या मराठी प्राथमिक शाळा क्रमांक १ च्या नवीन इमारतीमध्ये एकूण दहा वर्ग खोल्या आणि कार्यालय यांचा समावेश आहे. सदर निधी मंजूर झाल्यामुळे शहरातील नगरपालिकेच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मराठी प्राथमिक शाळा क्रमांक एकच्या नवीन इमारत बांधकामाला लवकरच सुरुवात होणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षात सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन त्यामध्ये शिक्षणाची सुविधा उपलब्ध होईल असा अंदाज आहे. मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी केलेल्या सदर मागणी ला आ.डॉ. शिंगणे यांनी निधी उपलब्ध करुण दिल्या बद्दल शहरवासियांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.