२४ तास खाजगी दवाखाने बंद
देऊळगांव राजा : अशरफ पटेल : कोलकाता येथील मेडिकल काॅलेजमध्ये एका महिला डाॅक्टरवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना ९ ऑगस्ट रोजी समोर आली. या घटनेचा निषेध म्हणून आणि विविध मागण्यांसाठी डॉक्टर असोसिएशनच्या वतीने शहरात कँडल मार्च काढून निषेध आला. तसेच २४ तास खाजगी दवाखाने बंद ठेवण्यात येणार आहे.
कोलकाता येथील आरजीकल मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. या घटनेचा पडसाद संपूर्ण देशभर उमटले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ वैद्यकीय क्षेत्रात जोरदार आवाज उठविला जात आहे. दि.१६ ऑगस्ट रोजी येथील डॉक्टर असोसिएशनचे वतीने संध्याकाळी कँडल मार्च घटनेच्या निषेधार्थ काढण्यात आला. या कँडल मार्चमध्ये डॉक्टर असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक,पत्रकार क्षेत्रातील नागरिकांनी निषेध नोंदविला आहे.
उद्या दवाखाने राहणार बंद :
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, कोलकात्यामध्ये आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कार झाला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व दवाखाने उद्या बंद राहणार आहेत. अशातच आता या घटनेमुळे देशातील वैद्यकीय सेवेवर मोठा परिणाम होणार असल्याचे दिसून येतं आहे.या घटनेच्या निषेधार्थ आजपासूनच देशभरातील डॉक्टरांकडून आंदोलन तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. दि.१७ ऑगस्ट रोजी शहरातील सर्व खाजगी दवाखाने बंद पुकारण्यात येत आहे. त्यामुळे शाहरातील सर्व दवाखाने, ओपीडी व क्लिनिक्सच्या सेवा १७ ऑगस्टला सकाळी ६ ते १८ ऑगस्टच्या सकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आव्हान डॉक्टर असोशियन तर्फे डॉ.सुनील कायंदे यांनी केले आहे.