देऊळगाव राजा : अशरफ पटेल : येथील ऑक्सफर्ड इंटरनॅशनल ड्रीम स्कुल मध्ये २१ जुन रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस विद्यार्थ्याना योग अभ्यासाचे धडे देऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
निरोगी शरीर तसेच स्वस्थ मनासाठी योग अतिशय आवश्यक आहे. दररोज योग केल्याने शरीराला ऊर्जा तसेच मनाला शांती मिळते. २०१५ पासून हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारतीय संस्कृती मध्ये योगाला खूप महत्व आहे. आजच्या धावपळीच्या काळात आपण योगाच्या अभ्यासातून आपले शरीर निरोगी व उत्साही ठेऊ शकतो अशी माहिती शाळेचे संस्थापक प्रमोद घोंगेपाटील यांनी विद्यार्थ्यांना दिली. यावेळी शाळेतली चारशे विद्यार्थ्यानी योगाची वेगवेगळी आसने करुण नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प केला. या योग प्रत्यक्षीकांमध्ये मुलांचा उत्साह वाढविण्यासाठी शाळेचे संस्थापक प्रमोद घोंगेपाटील, अध्यक्षा प्रिया घोंगेपाटील, उपमुख्याध्यापिका स्वाती भालेराव, शिक्षक लक्ष्मण खांडेभराड, रिता सुरोसे आदींसह शाळेचे क्रिडा शिक्षक रविंद्र खांडेभराड यांनी विशेष परिश्रम घेतले.