सिंदखेडराजा : प्रशांत पंडित :राजे लखुजीराव जाधव यांच्या कारकिर्दीचा साक्षीदार म्हणून भक्कमपणे उभा असलेला येथील जाधवांच्या राजवाड्यात सध्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत.याच कामांतर्गत मुख्यप्रवेशद्वारावरील भागाला दिल्या जाणाऱ्या रंगांमुळे राजवाड्याच्या मूळ स्वरूपात बेरंग होत असल्याची भावना स्थानिक नागरिकांसह, पर्यटक करीत आहेत. या बाबत सबंधित विभाग व कंत्राटदाराने लोकभावनेचा विचार केला पाहिजे अशी मागणी होत आहे.
सिंदखेड राजा विकास आराखड्या अंतर्गत राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यातील व राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळाचा विकास कामे सुरू आहेत त्या अंतर्गत जिजाऊ राजवाड्यांच्या मुख्य प्रवेशद्वारावर विटकरी रंग दिल्याने जिजाऊ भक्तासह गावकरी नाराजी व्यक्त करत आहेत. सिंदखेड राजा येथील राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थानाच्या विकासासाठी शासनाच्या वतीने निधी मंजूर करण्यात आला या निधी अंतर्गत १२ जानेवारी २०२४ रोजी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीरजी मुनगंटीवार पालकमंत्री दिलीप वळसे पाटील आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या कामाचे भूमिपूजन करण्यात आलं त्या अंतर्गत जिजाऊ राजवाडा मध्ये विकासाचे काम सुरू आहेत त्यामध्ये राजवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराला विटकरी रंग दिला आहेत त्यामुळे हा राजवाडा विद्रुप दिसत आहेत त्यामुळे शहरातील नागरिकासह जिजाऊ भक्त नाराजी व्यक्त करत आहेत. या राजवाड्याला पुरातन असा उठावदार रंग द्यायला पाहिजे असल्याचं मत शहरातील नागरिक व्यक्त करत आहेत.
- जिजाऊ राजवाड्याला जो इटकरी रंग दिला त्यामुळे राजवाडा विद्रुप दिसत आहेत पुरातत्व वास्तूला शोभेल असा ऐतिहासिक किल्ल्याचा लुक येईल अशा पद्धतीचा रंग द्यायला हवा होता.
माजी नगराध्यक्ष देविदास भाऊ ठाकरे
- इटकरी रंगामुळे राजवाडा विद्रुप झाला असून पर्यटकांना आकर्षित करील असा ऐतिहासिक वास्तू आकर्षक दिसेल अशा पद्धतीचा रंग देणे गरजेचे आहे.
शिवाजी राजेजाधव, अध्यक्ष राजे लखुजीराव जाधव शिक्षण संस्था सिंदखेड राजा
- पुरात्तात्विय शास्त्र संकेतनुसार जुन्या पद्धथीचे झीज होऊ नये म्हणून पूर्वी प्रमाणेच , सुरखी, बेल, गूळ…वापरून प्लास्टर केले आहे कुठल्याही रंग दिलेला नाही.प्लास्टर निघाल्यामुळे ब्रिक ची झीज होत होती ती यामुळे थांबणार आहे.
वैजनाथ फंड कंत्राटदार
- संवर्धनाचे काम प्राथमिक स्तरावर
राजवाड्यातील जतन व संवर्धनाचे काम प्राथमिक स्तरावर असून पुढील आठवड्यात मी या राजवाड्याची पाहणी करणार असून पुरातत्त्वदृष्ट्या जे सुसंगत राहील तसेच काम केल्या जाईल.मयुरेश खडके, उपसंचालक राज्य पुरातत्व विभाग नागपूर