राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी
देऊळगाव राजा : अशरफ पटेल : उर्दू माध्यमांच्या प्राथमिक शाळेमधून प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी अनुसूचित जमाती तसेच आणि मागासवर्गीय संवर्गातील उमेदवार उपलब्ध झाले नाही, तर ती पदे अनारक्षित समजून त्या पदावर खुल्या संवर्गातील उमेदवाराची नियुक्ती करावी.अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार ) तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.
राष्ट्रवादीच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, सध्या राज्यात पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती सुरू आहे. त्यामध्ये उर्दू माध्यमांच्या प्राथमिक शाळेतील अनुसूचित जमाती तसेच आणि मागासवर्गीय संवर्गातील रिक्त पदांची देखील भरती सुरू आहे. मात्र इस्लाम धर्मामध्ये मध्ये अनुसूचित जातीचा संवर्ग नसल्यामुळे तसेच उमेदवार उपलब्ध होत नसल्याने या संवर्गासाठी जागा राखून ठेवणे समर्थनीय नाही. यासंदर्भात माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी याचिका क्रमांक ६४२०/२००० मध्ये निर्णय देताना आदेश दिला आहे की, उर्दू माध्यमांच्या प्राथमिक शाळेतील प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे खुल्या संवर्गातील उमेदवारांची नियुक्ती करून भरण्यात यावीत. त्यामुळे सदर निर्णय विचारात घेऊन उर्दू माध्यमांच्या प्राथमिक शाळेमधून प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी अनुसूचित जमाती तसेच आणि मागासवर्गीय संवर्गातील उमेदवार उपलब्ध होत नसल्याने ती पदे अनारक्षित समजून त्या पदासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्ती द्यावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.