Matrutirth Express

Dynamic Date and Time
Weekly E-Paper
ई-पेपर
Weekly E-Paper

देऊळगांव राजा : अशरफ पटेल : २४ सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी आज दि. २५ एप्रिल रोजी, मा.सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाकरिता आवश्यक असलेल्या ई.रव्ही. एम. मशीन आणि इतर साहित्य मतदान चमू ला वाटप करण्यात आले आहे.
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण ३३६ मतदान केंद्रे आहेत, दि. २६ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाची सर्व तयारी झाली आहे, आज सिंदखेड राजा येथून मतदान साहित्य झोनल अधिकाऱ्यांच्यामार्फत मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांना देण्यात आले आहे. हे सर्व साहित्य ४३ बसेस तसेच १० खाजगी जीप च्या माध्यमातून मतदान चमू ला मतदान केंद्रापर्यंत आज पोहचवण्यासाठी दुपारी सर्व वाहने रवाना झाली आहेत. उद्या एकूण ३३६ मतदान केंद्रावर होणाऱ्या मतदानासाठी ४३ बस, ६६ खाजगी जीप, ५९३ पोलीस कर्मचारी आज मतदान केंद्राकडे रवाना झाली आहेत. मा. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, मा. तहसीलदार सिंदखेड राजा प्रवीण धानोरकर, मा. तहसीलदार देऊळगाव राजा वैशाली डोंगरजाळ, मा. नायब तहसीलदार सिंदखेड राजा मनोज सातव, मा. नायब तहसीलदार डॉ. अस्मा मुजावर, मा. नायब तहसीलदार नितीन बढे,मा. गटविकास अधिकारी देऊळगाव राजा मुकेश महोर, मा. गटविकास अधिकारी सिंदखेडराजा डॉ. श्रीकृष्ण वेणीकर, मा. मुख्याधिकारी सिंदखेडराजा प्रशांत व्हटकर, मा. मुख्याधिकारी देऊळगाव राजा अरुण मोकळ, प्रसार माध्यम नोडल अधिकारी अंकुश म्हस्के, उमेश गरकळ, प्रकाश शिंदे, संजय सोनुने, राजेंद्र खरात तसेच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!