सिंदखेड राजा : अशरफ पटेल : कोल्हापुर येथे रोलर ॲथलॅटिक मिनी स्टेट चॅम्पॅनशिप २०२४ या स्केटिंग स्पर्धा प्रथम आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये ॑ स्वराज्य रोलर स्केटिंग ॲकॅडमी उजळाईवाडी व गडमुडशिंगी मधील मुलांनी घवघवीत यश संपादन केले, यामध्ये बिगिनीयर स्केटिंग प्रकारात आडगाव राजा तालुका सिंदखेड राजा येथील सौ . रमा लहू काळे यांचा नातू व सौ. पल्लवी प्रशांत काळे यांचा मुलगा कु . सिद्धार्थ प्रशांत काळे २ सुवर्ण, यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर
कु .शिंवाश संतोष चुन्नामुरी रौप्य, कु. हर्षित महेश गुरव कांस्य, स्पीड क्वाड स्केटिंग प्रकारात कु. हर्ष विजय जाधव १ सुवर्ण व स्पीड इनलाइन स्केटिंग प्रकारात कु. स्वरा उमेश दोडमणी २ सुवर्ण अशी उत्तम कामगीरी करण्यात आली,या स्पर्धा २०० व ४०० मीटर मध्ये घेण्यात आल्या या सर्वांना स्वराज्य रोलर स्केटिंग ॲकॅडमी च्या NIIS राष्ट्रीय प्रशिक्षिका सौ.शुभांगी कांबळे मॅडम यांचे मार्गदर्शन मिळाले तसेच सर्व पालक व ॲकॅडमीचे अध्यक्ष विजय जाधव सर व सदस्य यांचे सहकार्य लाभले.