देऊळगांव राजा : प्रतिनिधी : अंबाशी येथून जालना कड़े लग्नाच्या कार्यक्रमाला जाताना भरधाव वेगाने जात असलेली स्कार्पिओ दगड़वाडी फाट्यावरील असलेल्या डिवाईडर वर धडक लागल्याने स्कार्पिओ पलटी झालेली बसलेले ३ प्रवासी जागीच ठार तर १ गंभीर आणि ५ किरकोळ जख्मी झाल्याची घटना संध्याकाळी ६ च्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार चिखली तालुक्यातील अंबाशी येथील रहिवासी स्कार्पिओ गाडीने हळद लावण्यासाठी जालना कडे जात असताना तालुक्यातील दगड़वाडी पाट्यासमोर चालकाचा ताबा सुटला आणि गाड़ी डिवाडर वर जाऊंन पलटी झल्याने भीषण अपघात झल्याने त्यातील विलास जयवंतराव देशमुख वय ७६ रा. अंबाशी (चिखली), अशोक भीमराव नयाक वय ६५ रा.सावणा (वाशिम), वसंत देविदास देशमुख वय ४३ रा.अमानी वाशीम हे जागीच ठार झाले तर चालक योगेश लक्ष्मण देशमुख रा.अंबाशी (चिखली) हे गंभीर झल्याने पुढील उपचारा साठी जालना येथे हलविन्यात आले आहे. तसेच मिरा संजय देशमुख, शालिनी अनंता देशमुख, अक्षदा संदीप देशमुख, गोपाळ देशमुख, गजानन आसाराम तौर हे किरकोळ जख्मी झाले त्यांचा उपचार स्थानिक ग्रामीण रुग्णालयात सुरु आहे. या भीषण अपघातामुळे आंबाशी गावात शोकाकुळ पसरली आहे.